...

परिसरात (Parisarat)

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar

Language : मराठी (Marathi)

125
Available Stock : 10

ग्रंथ विशेष:

पृष्ठ संख्या: एकूण १२४     

आवृत्ती: सहावी– जून २०१०

आकार: १४० मि.मी. x २१६ मि.मी.

आजचा माणूस म्हटला म्हणजे वस्तुस्थितीचे ज्ञान नसल्यामुळे बावरलेला आणि त्यामुळे परिस्थितीने गांजलेला, हतबुद्ध, प्रतिकारशक्ती नसलेला, अभिनिवेश विरहित, अगतिक झालेला असा दिसून येतो. ही मानवी जीवनाची विटंबना माणसाने प्रयत्नानेच बदलावयास हवी.

‘परिसरात’ च्या वाचनाने काल काय होते, आज काय आहे व उद्याला काय असेल व उद्याला काय घडवून आणावयास पाहिजे याचा बोध होतो. आहे ही परिस्थिती कशाने बदलेल हेही कळत नसते. वैयक्तिक वा सामाजिक दारिद्र्य व दैन्य ही वस्तुस्थितीचा नीट उमज न पडल्यामुळेच परिणामस्वरूप म्हणून भोगावी लागत असतात.

सुखी होण्यास शहाणपणाची गरज आहे. हे शहाणपण शिकण्याइतपत तरी शहाणपण ‘परिसरात’ च्या वाचनाने येते.

जे ज्ञान व्यवहार्य करता येत नाही त्याचा उपयोग इतरांसाठी तरी बडबडीपुरता आणि अभिमानाचे ओझे वाहण्याइतकाच असतो.

वाट्यास येईल तसे जीवन जगणे वा काळ कंठित राहणे हे माणुसकीला लांछनास्पद आहे. तेव्हा या काळात ‘परिसरात’ विकत घेणे, वाचणे व अभ्यास करणे म्हणजेच आपल्या माणुसकीला जगणे होय.

परिसरात ग्रंथ चार सत्रांमध्ये विभागला असून पहिले सत्र नास्तिकता, दुसरे सत्र शिक्षण, तिसरे सत्र स्वभाव आणि चौथे सत्र आस्तिकता आहे. या ग्रंथास प्रस्तावना स्वातंत्र्यसेनानी व थोर कार्यकर्ते श्री. पुंडलीकजी कातगडे यांची आहे.

प्रत्येक सत्रांमध्ये असलेले लिखाण हे सूत्रस्वरूपातील असून पहिल्या नास्तिकता या सत्रात 19 सूत्रे आहेत, दुसर्‍या शिक्षण या सत्रात 25 सूत्रे आहेत, तिसर्‍या स्वभाव या सत्रात 50 सूत्रे आहेत आणि चौथ्या आस्तिकता या सत्रात 43 सूत्रे आहेत. ग्रंथाचा समारोप प. पू. डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर यांनी रचलेल्या प्रार्थनेने केलेली आहे. 

या ग्रंथाच्या अभ्यासाने जसे स्वत:त सुयोग्य बदल घडवून आणता येतात तसेच हा ग्रंथ विद्वानांच्या अभ्यासाला गती देणारा ठरतो.


Related Products

...
संपर्क - हिंदी संस्करण (Sampark - Hindi)

By: विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)

...
तोंडओळख (Tondolakh)
Price: 150

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, संकलन- द. पा. जोशी Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar, Compiled by D. P. Joshi

...
स्वभाव ( La Nature Humaine )

By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)

...
स्वभाव (Swabhav)
Price: 100

By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)